Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत पात्र झालेल्या स्थानिकांना त्यांच्याच तालुक्यात नेमणूक द्यावी..! ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत पात्र झालेल्या स्थानिकांना त्यांच्याच तालुक्यात नेमणूक द्यावी..! श्री योगेश धुरी

235

सिंधुदुर्ग:  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत पात्र झालेल्या स्थानिकांना त्यांच्याच तालुक्यात नेमणूक द्यावी. तसेच कुठल्याहि परिस्थितीत जोपर्यंत स्थानिक डी. एड.  उमेदवार यांचे समायोजन होत नाहि किव्हा त्यांचा निर्णय लागत नाहि तोपर्यंत परजिल्हातील शिक्षकांना एकालाही रुजू होऊ देणार नाही. असा इशारा कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी सरकारला दिला आहे.

 

याबाबत कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत पात्र झालेल्या स्थानिकांना त्यांच्याच तालुक्यात नेमणूक व्हावी  यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यअधिकारी तसेच सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यअधिकारी यांना निवेदन देतांना योगेश धुरी आणि सहकारी

तसेच कुठल्याहि परिस्थितीत जोपर्यंत स्थानिक डी एड उमेदवार यांचे समायोजन होत नाहि किव्हा त्यांचा निर्णय लागत नाहि, तोपर्यंत परजिल्हातील शिक्षकांना एकालाही रुजू होऊ देणार नाही. एकूण ६१५ पैकी हाताच्या बोटावर मोजण्यावढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक भरती झाले आहेत, बाकीच्या बेरोजगारांनी करायच कांय ? असा सवाल योगेश धुरी यांनी उपस्थितीत केला आहे.

शिक्षणमंत्री जिल्ह्यातील असून काय फायदा? ते आपल्या जीवाची मजा जंगल सफारी करून करता आहेत. आमच्या जिल्ह्याच दुर्भाग्य आहे. हे असले मंत्री आपल्या ला लाभले. त्यांनी सर्व डी. एड. उमेदवारांच्या पोटावर लाथ मारली आहे. त्यांच्या आयुष्याचा सत्यनाश केला आहे.  म्हणून त्यांचा गांधी चौकात सत्कार केला पाहिजे. असा खोचक टोला योगेश धुरी यांनी लगावला आहे.

तसेच आतां डी. एड. बेरोजगारांनी देखील रस्त्यावर उतरलं पाहिजे. घराकडे बसून नोकऱ्या मिळणार नाहीत. संघर्ष केला पाहिजे,आंमच्या सारखे अनेक लोक तुमच्या सोबत आहेत. युवासेना युवकांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार विनायकजी राऊत साहेब, कार्यसम्राट आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कोकण सचिव तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली लढत राहणार. असे कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी म्हणाले.