कुडाळ (माणगांव): सिंधुदुर्ग मधील अतिवृष्टीत माणगांव आंबेरी पुलावरुन दत्ताराम लाडू भोई, माणगाव बेनवाडी हे दिनांक ०७ जुलै २०२४ रोजी दुपारी १.०० वाजताच्या दरम्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना काही प्रत्यक्षदर्शीनी बघितले आणि लगेच संबंधित महसूल,आपत्ती व्यवस्थापन,पोलीस यंत्रणेला कळविले.
अद्याप पर्यंत प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाही स्वतः जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून कळविले मात्र त्यांना कुठल्याही परिस्थितीत गांभिर्य दिसत नाही. जिल्ह्याचे पालकत्व ज्यांनी स्वीकारलं ते अद्याप जिल्ह्यात आलेच नाहीत,जिल्ह्यातील लोकांची काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे .परंतु त्यांना काहीही याविषयी देणे घेणे दिसत नाही.
आज ४ दिवस उलटूनही गेले तरीही शोधकार्य केले नाही त्यामुळे त्या व्यक्तीस दगाफटका झाल्यास पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी कुडाळ पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, शिवसेना तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,युवासेना शहरप्रमख संदीप म्हाडेश्वर, युवासेना शहर समन्वयक अमित राणे उपस्थित होते