Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर

127

मसुरे प्रतिनिधी: शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना जिल्हा बँक कशा पद्धतीने मदत करेल, त्यासाठी काय धोरण आखावं लागेल, शेतकऱ्यांनी केलेले नवीन प्रयोग आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी यासह जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर पोहोचले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वर्षभरापासून जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद आणि त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी मालवण तालुक्यातील मसुरे येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन भेटी घेतल्या. सुरुवातीला मसुरे येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेला भेट दिली. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, डॉ. विश्वास साठे, महेश बागवे, जिल्हा बँक मसुरे शाखेचे संतोष गांवकर, गवंडे, पांडुरंग ठाकूर, सिद्धेश मसुरकर, तुळशीदास चव्हाण, अभि घाडीगावकर, महमद शेख, नारायण परब, जयप्रकाश बांदिवडेकर, उमेश बागवे, कृष्णा गिरकर, शशांक ठाकूर, जगदीश चव्हाण यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.यावेळी शेतकऱ्यांनी म्हैशीसाठी लागणारा सुका चारा कमी दरात मिळावा. त्यांना लागणाऱ्या खाद्याचे पैसे आणि दुधाचे पैसे यात काहीही फायदा होत नाही. शिवाय स्थानिक डॉक्टर असावा, गोठ्यासाठी अडीच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्हा बँकेकडून कर्ज मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नवीन जनावरे आणली आहेत. अनेक तरुण या व्यवसायात उतरले असून नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्यासाठी काय योजना आणू शकतो याबाबत यासाठी शेतकऱ्याकडे गेल्याशिवाय, त्यांच्याशी संवाद साधल्याशिवाय त्यांच्या समस्या समजणार नाहीत. त्यावर जिल्हा बँकेला आपले धोरण आखेल. शासनाकडून कशी मदत मिळेल यासाठी आपला प्रयत्न आहे. उद्योजकांना सहज कर्ज जिल्हा बँके मार्फत दिले जाते. यापुढील काळात सुद्धा शेतकऱ्यांनी प्रस्ताव केल्यावर लवकरात लवकर कर्ज देण्याबाबत आपले प्रयत्न सुरू असल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.फोटो सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी मसुरे येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेला भेट दिली. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, डॉ. विश्वास साठे, महेश बागवे, जिल्हा बँक मसुरे शाखेचे संतोष गांवकर, गवंडे, पांडुरंग ठाकूर, सिद्धेश मसुरकर, तुळशीदास चव्हाण, व इतर.

छाया दत्तप्रसाद पेडणेकर