Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश मस्के…

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश मस्के…

173

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश मस्के तर कार्यवाह राजन पांचाळ, उपाध्यक्षपदी धाकु तानावडे, रुजरिओ पिंटो, सहकार्यवाह विठ्ठल कदम, ऋतुजा केळकर, महेश बोवलेकर यांची निवड करण्यात आली आहे. तीन वर्षासाठी नूतन कार्यकारणी निवडण्यात आली आहे. मावळते जिल्हाध्यक्ष आनंद वैद्य यांनी नूतन जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के व सचिव राजन पांचाळ व सर्व नवीन कार्यकारणी सदस्य व विभागीय प्रतिनिधी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी विभागीय प्रतिनिधी पदी भरत गावडे, सतीश गावडे, गजानन मडवळ यांची एकमताने निवड करण्यात आली. तर कार्यकारणी सदस्य पदी संजय वेतुरेकर, ॲड संतोष सावंत, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, आनंद वैद्य, उषा आठल्ये, प्रवीण भोगटे, प्रसाद दळवी, भार्गव राम धुरी, संजय शिंदे, जयेंद्र तळेकर, दीक्षा परब आदींची निवड एकमताने करण्यात आली.

जिल्हा ग्रंथालय संघाची निवड एकमताने करण्यात आली होती. त्यानंतर आज रविवारी कुडाळ येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथ संग्रहालय येथे बैठक पार पडली. जुन्या नव्या कार्यकारणी सदस्य यांची बैठक घेण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारणी निवडण्यात आली.  कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव मंगेश मस्के यांची एकमताने  जिल्हा अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासन मान्य जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी श्री मस्के यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वी त्यांनी कोकण विभागीय ग्रंथालय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई,  पालघर ग्रंथालय संघाच्या विद्यमान अध्यक्ष होते. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे बारा वर्षे प्रमुख कार्यवाह म्हणून काम केले आहे. कोकण विभागीय ग्रंथालय संघात तीन वर्ष प्रमुख कार्यवाहक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे तीन वर्ष कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे बारा वर्षे संचालक, रा.ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय कुडाळचे १४ वर्ष संचालक, शासनमान्य ग्रंथालय अधिवेशन कार्यशाळा ग्रंथालयांना भेटी आधी विविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत. ग्रंथालयाच्या व ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोनवण्यासाठी मोर्चा, धरणे आंदोलनाचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, तथा माजी खासदार, आमदार यांच्याशी ग्रंथालय व ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या प्रश्न मागण्यासाठी शासन दरबारी पत्र व्यवहार करून समस्या सोडवण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. प्रामाणिक निस्वार्थीपणे ग्रंथालय चळवळीत केलेल्या कार्याची त्यांना या निमित्ताने पोच मिळाली आहे. त्यांची एकमताने सर्व निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल बोलताना श्री मस्के म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर आपले प्रयत्न राहतील. सर्वांना एकत्र घेऊन निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाची व्याप्ती अधिकाधिक वाढवण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहणार आहेत. असे ते म्हणाले.

यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष आनंद वैद्य यांनी स्पष्ट केले की, सर्वांच्या सहकार्यामुळे आपण सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दोन टर्म काम केले. जिल्हा ग्रंथालय संघ च्या माध्यमातून ग्रंथालय चळवळ अधिक व्यापक करण्याचे तुम्ही आपले प्रयत्न राहणार आहेत.

यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाच्या नूतन संचालक पदी ॲड. संतोष सावंत, संजय वेतुरेकर, नंदन वेंगुर्लेकर, भार्गव राम धुरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नूतन सचिव, श्री पांचाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी झालेल्या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. नवीन सभासद वाढवणे अ ब क ड ग्रंथालय यांना प्रोत्साहन देणे, ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ व विविध समस्यांबाबत शासनदरबारी आवाज उठवणे आधी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

फोटो:  कुडाळ सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी मंगेश मस्के व कार्यवाहक राजन पांचाळ व आधी नूतन पदाधिकारी कार्यकारणी सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना मावळते जिल्हाध्यक्ष आनंद वैद्य, धाकु तानावडे, विभागीय प्रतिनिधी भरत गावडे, विठ्ठल कदम, ॲड संतोष सावंत, संजय वेतुरेकर, नंदन वेंगुर्लेकर, संजय शिंदे, बाजूला अन्य पदाधिकारी.