Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्हातील शासकीय यंत्रणेच्या ढिम्म कारभाराबाबत जिल्हावासियांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना साकडे

सिंधुदुर्ग जिल्हातील शासकीय यंत्रणेच्या ढिम्म कारभाराबाबत जिल्हावासियांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना साकडे

119

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या जिल्हा दौऱ्यात येथील कार्यालयात जिल्ह्यातील नागरिकांकडून अनेक निवेदने देण्यात येतात. ज्यात नागरिकांच्या दैनंदिन जगण्यातील छोट्या छोट्या समस्यांचा समावेश असतो. पालकमंत्री कार्यालयाकडून पाठपुरावा केला जातो. मात्र, शासकीय यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे असे प्रश्न तडीस जात नाही. विशेषतः नागरिकांच्या महसुली, आरोग्य अशा कामांमध्ये यंत्रणेचे वेळकाढू धोरण आडवे येते, यावर्षात आचारसंहितेची, कर्मचारी कमी असल्याची कारणे देत नागरिकांना अनेक साध्या साध्या प्रश्नांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. सरकार हे सामान्य लोकांना दिलासा देणारे, त्यांच्या सुसह्य जगण्याप्रती कटिबद्ध सरकार आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त केलेले आहे. त्याला सुशासनाची जोड गरजेची आहे.

 

जिल्ह्यातील नागरिकांच्या महसुली, आरोग्यविषयक आणि अनेक प्रलंबित समस्यांना गती देण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी १२, १३, १४ ऑगस्ट कालावधीत अनुक्रमे कणकवली, कुडाळ-मालवण आणि सावंतवाडी या तीन मतदरसंघातील नागरिकांसाठी जनता दरबाराचे आयोजन केलेले आहे. यावेळी संबंधित सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांची परिपूर्ती करणार आहेत. तरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की दि.५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आपापल्या प्रलंबित समस्यांचे एक तपशीलवार निवेदन भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय सिंधुदुर्गनगरी, आ. नितेश राणे यांचे कार्यालय कणकवली, नीलेश राणे यांचे कार्यालय मालवण-कुडाळ आणि राजन तेली यांचे कार्यालय सावंतवाडी तसेच सर्व तालुका भाजपा कार्यालये या ठिकाणी दोन प्रतीत आणून द्यावीत. संबंधित तारखांना आपल्याला उपस्थित राहण्यासाठी स्थळ आणि वेळ कळविली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.