सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी सह्याद्री फाउंडेशन तर्फे भरवण्यात येणारा मान्सून महोत्सव २०२३ च्या अंतर्गत येत्या नऊ ऑगस्टला सायंकाळी पाच ते सात या वेळेत रानभाज्या पाककला प्रदर्शन व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १५ ऑगस्ट पर्यंत खुल्या गटात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाळी ऋतूतील रानभाज्या कशा बनवल्या जातात आणि त्यांची चव याबाबत प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. तसेच या मध्येच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून उत्कृष्ट तीन क्रमांकाच्या भाज्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत भाग घ्यावा. ही स्पर्धा नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी सायंकाळी पाच ते सात या वेळेत सावंतवाडी गार्डन जवळील हॉटेल पलॅ मॅंगो टू या ठिकाणी भरवण्यात येणार आहे. तरी अधिक माहितीसाठी विभावरी सुकी व मोहिनी मडगावकर 9423220138 यांच्याकडे संपर्क साधावा. तसेच सैनिक पतसंस्था मुख्य कार्यालय या ठिकाणी नावे नोंदवावीत. असे आवाहन करण्यात आले आहे.
याच दिवशी सायंकाळी चार वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे माता बाल संगोपन किटस वाटप कार्यक्रम होणार आहे. तसेच १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याविषयी खुल्या गटात निबंध स्पर्धा १००० शब्द मर्यादा फुलस्कॅपवर आपले नाव व पत्ता व मोबाईल नंबर टाकून निबंध १४ ऑगस्टपर्यंत सैनिक पतसंस्था कार्यालय तसेच संजू परब संपर्क कार्यालय येथे आणून द्यावीत. अधिक माहितीसाठी प्रल्हाद तावडे यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
