Home स्टोरी सावंतवाडी शिवधर्म प्रतिष्ठान व शिवप्रसाद कला क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी……

सावंतवाडी शिवधर्म प्रतिष्ठान व शिवप्रसाद कला क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी……

71

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरासह तालुक्यात ग्रामीण भागात, सर्वत्र गावागावात, ग्रामपंचायत, शाळेमध्ये, संस्था, संघटना आधी विविध ठिकाणी आज जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव जल्लोषात साजरी करण्यात आली. सावंतवाडी शहरात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावंतवाडी खासकीलवाडा गावडेशेत येथील शिवधर्म प्रतिष्ठान व शिवप्रसाद कला क्रीडा मंडळ तर्फे शिवजयंती उत्सव निमित्त विद्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवाजी महाराजांचा पुतळ्यास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, अजय सावंत, बंटी पुरोहित, महेश पांचाळ, गुरु गावडे, अथर्व पांचाळ, अक्षय रेडकर, निखिल गावडे, लक्ष्मीकांत पांचाळ, रमाकांत पांचाळ, अमय रेडकर, आर्यन पांचाळ, संदेश रेडकर आधी उपस्थित होते. तर सावंतवाडी दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळ तर्फे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजू परब, खजिनदार भूपेंद्र सावंत, महिला तालुकाध्यक्ष संजना परब, विनोद सावंत, सौ सावंत, समीर पालव आधी उपस्थित होते. सावंतवाडी शहरात आज सर्वत्र भगवेमय वातावरण झाले होते. तसेच माडखोल, कलंबिस्त, शिरशिंगे, गोटेवाडी, सांगेली आधी ठिकठिकाणी शिवजयंती निमित्त भव्यरॅली काढण्यात आली.

कलंबिस्त गणशेळवाडी येथे रॉयल बुलेट यांच्या हस्ते शिवजयंती साजरी करण्यात आली. तसेच कलंबिस्त मळा येथेही शिवजयंती उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम करण्यात आले. आधी ठिकठिकाणी गावागावात आज शिवजयंती उत्सव साजरी करण्यात आले.

फोटोमध्ये सावंतवाडी शिवधर्म प्रतिष्ठान व शिवप्रसाद कला क्रीडा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्सव साजरा करताना माजी नगराध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, महेश पांचाळ, लक्ष्मीकांत पांचाळ, गुरु गावडे आधी.