Home स्टोरी सावंतवाडी शहरातील पाणी टंचाई प्रशासन निर्मित!

सावंतवाडी शहरातील पाणी टंचाई प्रशासन निर्मित!

183

सावंतवाडी प्रतिनिधी: – शहरास २४ तास पाणी मिळण्यासाठी जी जल-वाहिनी घालायची आहे ती राखीव वन क्षेत्रातून जात असल्याने वन विभागाची परवानगी अत्यावश्यक असून त्या परवानगीसाठी विशेष प्रयत्न आत्मियता दाखविली नसल्याने परवानगीस अपयश आले असून शहरातील पाणी टंचाई हि निसर्ग निर्मित नसून प्रशासन निर्मित आहे..सावंतवाडी शहरास २४ तास पाणी पुरवठा करणार या संकल्पनेतून न.पा. प्रशासनाने धरण्याची उंची वाढविण्याचे ठरविले तसा आराखडा तयार करून धरणावर १ कोटी रुपये खर्च करुन गोडबोले गेट बसविण्यात आले. गेट बसविल्यानंतर धरणाची उंची १७ मीटर होती ती १८ मीटर होऊन सांडव्यावरुन पाणी वाहू लागले. पाणी साठा एका मीटरने वाढला परंतु २४ तास पाणी वाहुन शहरात आणण्यासाठी जी जल-वाहिनी पाळणेकोंड धरण ते सावंतवाडी शहर आर्थिक तरतुद करुनही सदरील वाहिनी वन क्षेत्रातून जात असल्याने वन विभागाची परवानगी घेणे अत्यावश्यक असल्याने हि परवानगी आज २०२३ पर्यंत घेण्यासाठी विशेष प्रयत्न आत्मियता दाखवण्यात आलेली नाही. त्याच कारणाने वाहिनी घालू शकण्यात आलेली नाही. म्हणूनच शहरात पाणी टंचाई जाणवत आहे.पाणळेकोंड धरणाची एकुण उंची १८ मीटर असून धरण भरले की, १८ मीटर वरुन सांडव्या वरुन पाणी वाहते. संध्या पाण्याचा वापर १० मीटर झाला असून अंदाजे ८ मीटर पाणी धरणात शिल्लक आहे.

धरणामध्ये पाणी सोडण्यासाठी ४ बॉल असून सध्या दुसरा वॉल चालू असून दुसऱ्या बॉलवर पाणी अर्धा मीटर शिल्लक आहे. अद्यापही दोन वॉल पाण्यात असून अद्यापही ७ जून रोजी ८ मीटर पाणी शिल्लक आहे. सावंतवाडी शहरात ऐन पावसाळ्यात जो शहराला पाणी पुरवठा होतो तोच पुरवठा आज ७ जून रोजी होत असून नागरीकांनी काही दिवस पाऊस पडला नाही तरी शहरात पाणी टंचाई होणार नाही. याची शाश्वती बाळगावी.मनाला खेदजनक बाब म्हणजे पाळणेकोंड धरणातून सावंतवाडी शहरातील जुनी वाहिनी जवळजवळ ३४% गळती असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. ती गळती काढण्याची बुद्धी प्रशासनाला होत नाही.

शासन पाणी वाचवा याची जाहिरात करत असते पण दोन वेळा बॅग वॉशिंग करताना दोन लाख लीटर पाणी वहाळात सोडले जाते याचा पुर्नवापर करावा हेही सुचत नाही. तसेच पाण्याचा अपव्यय कोण करत हे पाहण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली जाते. परंतु पथकाच्या गळत्या निदर्शनास येत नाहीत, म्हणूनच सावंतवाडी शहरातील पाणी टंचाई निसर्ग निर्मित नसून प्रशासन निर्मित आहे. तरी नुतन मुख्य अधिकारी यांनी याची पडताळणी करावी. सावंतवाडी शहरात लाखे वस्ती, शिल्पग्राम, चिवार टेकडी, उभा बाजार येथे ज्या पाण्या टाक्या बांधल्या आहेत त्या कोरड्या आहेत याची नूतन मुख्याधिकारी यांनी पडताळणी करावी अशी शहर वासियांची अपेक्षा आहे.