सावंतवाडी प्रतिनिधी: ३ एप्रिल :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग, बलीदान, देशभक्ती यांचे स्मरण करून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विध्यामानाने शहरात ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आली. यावेळी यात्रेमध्ये भाजपचे माजी आमदार राजन तेली . सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब , शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अशोक दळवी, शहरध्यक्ष नारायण राणे , यांच्या प्रमुख उपस्थिती होती. सावंतवाडी भाजप कार्यालय येथून भाजपचे कार्यकर्ते , शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवस्थानाहून शिवसेनेचे कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते, हि यात्रा पंचम खेमराज महाविध्यालय , मिलाग्रीस हायस्कूल, सबनीस वाडा , मुख्य बाजारपेठ , होऊन गांधीचौक येथे सांगता करण्यात आली.
गौरव यात्रेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर” ‘मी सावरकर’, अशा लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान केलेले आम्ही सर्व सावरकर असे फलक हातात घेतलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोठ्या प्रमाणार महिला उपस्थित होत्या.