Home स्टोरी सावंतवाडी येथे आयोजित राज्यस्तरीय बाल विज्ञान प्रदर्शनात २५०० हून अधिक विध्यार्थी सहभागी..!

सावंतवाडी येथे आयोजित राज्यस्तरीय बाल विज्ञान प्रदर्शनात २५०० हून अधिक विध्यार्थी सहभागी..!

294

सावंतवाडी प्रतिनिधी: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नामुळे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन सावंतवाडी जिमखाना मैदानावर १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत त आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास २५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ४०२ राज्यभरातून आलेल्या विविध मॉडेल चा अभ्यास केला. राज्यभरातून प्रत्येक जिल्हा निहाय विविध मॉडेल्स या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. राज्यस्तरीय बाल विज्ञान प्रदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेषता सावंतवाडीत होत असल्याने शिक्षण मंत्री श्री केसरकर यांनी २५ लाख रुपये बालभारती मंडळाच्या माध्यमातून शिक्षण विभागाला देत प्रत्येक गावातील प्राथमिक ते माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना या प्रदर्शनास सहभागी करून घ्या अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार दुसऱ्या दिवशी रविवार व तिसऱ्या दिवशी सोमवार या दोन दिवशी आतापर्यंत जवळपास साडेचार हजार विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात भेट दिली.

शनिवारी १० फेब्रुवारीला विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ऑनलाईन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या विज्ञान प्रदर्शनात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण ऑनलाईन आले खरे पण त्यांना विज्ञान प्रदर्शन बाबत त्यांनी एक चकाराही शब्द काढला नाही. या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात नळ पाणी योजना ५५ कोटी रुपये खर्चाची त्यासंदर्भात त्यांनी भाष्य केले. त्यामुळे राज्यभरातून आलेल्या शिक्षक विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सोमवारी तिसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेले प्रदर्शन त्यामध्ये प्रत्येक शाळातून विद्यार्थी या प्रदर्शना भेट देत होते.

या प्रदर्शनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची व त्यांना खाण्याची व पाणी सर्व व्यवस्था शिक्षण विभागामार्फत करण्यात आली होती. शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी त्यांचे स्वागतही केले. आज प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाभरातून सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती.  त्यामुळे प्रदर्शनात स्थानिक विध्यार्थ्यांची भरणा अधिक दिसत होती. राज्यस्तरीय प्रदर्शनात दर्जेदार आणि नीटनेटकी तसेच पर्यावरण पूरक आणि आजच्या विज्ञान युगातील इलेक्ट्रॉनिक उपकरणावर आधारित मॉडेल्स मांडण्यात आली होती. विशेष म्हणजे या प्रदर्शनात येत्या काळात इलेक्ट्रॉनिक चार चाकी वाहने रस्त्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहन कसे चालवायचे याबाबतचेही मॉडेल्स मांडण्यात आले होते. रिमोट कंट्रोलवर शेतीची पेरणी, नांगरणी आणि पाणी शिंपणे हे तुम्ही घरबसल्या रिमोट वर सहजरीत्या करू शकता हेही मॉडेल्स अत्यंत दर्जेदार आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

स्थानिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांमधून इलेक्ट्रॉनिक बटनावर आधारित उपकरण सौलिंगवत हिने मांडले होते. अशी विविध प्रकारचे मॉडेल्स येत्या काळातील भविष्याचा वेध घेणारी होती. विशेष करून शिक्षण मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री असल्या मुंबई भागातून दर्जेदार मॉडेल्स आणि विद्यार्थी हे प्रदर्शन पाहण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांची उत्तमरीत्या राहण्याची व सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांच्या मातोश्री इंदुबाई कुडाळकर यांचा सन्मान गौरव करण्यात आला.