सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय जानकीबाई सुतिका ग्रह मध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त येत्या २० फेब्रुवारीला सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत सर्व वृत्तपत्रातील तसेच मीडिया पत्रकार कर्मचारी कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी अभियान राबवण्यात येत आहे. तरी या आरोग्य तपासणीमध्ये हिमोग्लोबिन रक्त तपासणी तसेच आधी विविध आजारांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी भाई साहेब आयुर्वेदिक महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत. सध्या वृत्तपत्रातील कर्मचारी तसेच पत्रकार यांच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्याच्या दृष्टीने भाऊसाहेब आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या संस्थेने हे पाऊल उचलले आहे. समाजाच्या हितासाठी नेहमीच वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकार व कर्मचारी यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी हे अभियान राबवण्यात येत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट दिलीप नार्वेकर व संचालक उमाकांत वारंग प्राचार्य संजय दळवी यांनी स्पष्ट केले. तरी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ पत्रकार व कर्मचारी वर्गाने घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
Home स्टोरी सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय जानकीबाई सुतिकाग्रह येथे मोफत आरोग्य शिबिराचे...