Home स्टोरी सावंतवाडी येथील जानकीबाई सुतिका ग्रहातील नर्स सौ. ज्योती अमर बागकर यांचं निधन.

सावंतवाडी येथील जानकीबाई सुतिका ग्रहातील नर्स सौ. ज्योती अमर बागकर यांचं निधन.

400

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील जानकीबाई सुतिका ग्रहातील नर्स सौ. ज्योती अमर बागकर वय ४५ वर्ष यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सायंकाळी निधन झाले. त्यांना गेल्या दोन दिवसांपूर्वी उलट्या त्रास जाणवत होता. म्हणून त्यांना सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या सर्व तपासण्या केल्या असता .त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे निदान करण्यात आले आहे. मूळ वेंगुर्ले टाकरवाडी येथील असून त्यांचे माहेर बांदा येथील आहे. सावंतवाडी भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या जानकीबाई सुतिका ग्रहात त्या गेल्या पंधरा वर्षापासून नर्स म्हणून कार्यरत होत्या. मनमिळावू शांत स्वभावाच्या सर्वांशी सौजन्याने वागणाऱ्या अशी त्यांची ओळख होती. २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशी दिवशी त्या रुग्णालयात कामावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांना त्रास जाणू लागल्याने त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. मात्र त्यानंतर त्यांना काल ३१ ऑक्टोबरला रात्री खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना काल शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या अकस्मित जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. पश्चात पती, ननंद, विवाहित दोन बहिणी, भाऊजी असा परिवार आहे. भाईसाहेब आयुर्वेदिक महाविद्यालयाचे जानकीबाई सुतिका ग्रह चे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट दिलीप नार्वेकर, सचिव बाळासाहेब बोर्डेकर, संचालक उमाकांत वारंग व कर्मचारी व नर्स आदींनी शोक व्यक्त केला आहे.