सावंतवाडी प्रतिनिधी: दिवाळीचा साहित्य फराळ प्रत्येकाने चाळायलाच हवा आणि जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने साहित्य फराळ वाचाल तेव्हा खऱ्या अर्थाने वाचन संस्कृती वाढेल. अशा शब्दात मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर चे अध्यक्ष महेश खानोलकर यांनी व्यक्त केले. मळगाव वाचनालय येथे येथे दिवाळी अंक २०२४ – २०२५ वाचन योजना सोहळा संस्था अध्यक्ष महेश खानोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मळगाव हायस्कूल चे स्थानिक शालेय समिती अध्यक्ष मनोहर राऊळ, सहशिक्षिका मोर्ये, ग्रंथपाल सतीश राऊळ, माजी मुख्याध्यापक प्रभाकर तेली, वैजनाथ देवन, गोविंद मोर्ये, संस्था संचालक बाळकृष्ण मुळीक, सुभाष गवंडे, सुभाष नाटेकर, संस्था ग्रंथपाल आनंद देवळी, अमेय लोके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि संस्था वाचक सभासद तसेच अन्य वाचकांना दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वाचन मंदिरतर्फे करण्यात आले आहे.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.