Home स्टोरी सावंतवाडी भटवाडी मोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले! मोटर सायकल चालक बाल बाल...

सावंतवाडी भटवाडी मोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले! मोटर सायकल चालक बाल बाल बचावला.

77

सावंतवाडी: भटवाडी लक्ष्मीनारायण मंदिर जवळ आज सकाळी नऊ वाजता भले मोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. त्यात एक मोटर सायकल चालक बाल बाल बचावला. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. चालू विद्युत लाईन तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. सामाजिक बांधिलकीच्या टीमने तत्परता दाखवत सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर व शाम हंडळकर तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन सर्वप्रथम एमईसीबीला फोन करून रस्त्यावरची लाईन बंद करायला लावली. त्यानंतर कटरच्या साह्याने अवघ्या तासाभरात झाड कट करून वाहन चालकांना व ग्रामस्थांना रस्ता मोकळा करून दिला. सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचेही खूप मोठे सहकार्य लाभले. तसेच शानू सुभेदार, बंड्या केरकर, संतोष कुलकर्णी, प्रसाद राणे सहकार्य लाभले. तसेच एमईसीबीचे कर्मचाऱ्यांनी खूप मोठी कसरत करून अवघ्या चार तासात लाईट सुरू केली. त्यांचीही भटवाडीतील ग्रामस्थ व सामाजिक बांधिलकी कडून विशेष कौतुक करण्यात आले.