सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी नगरपरिषदेकडून दि. ०१ जानेवारी २०२४ पासून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता व पाणीपट्टी कर विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरातील सर्व सुजाण नागरीकांना नगरपरिषदेकडून आवाहन करण्यात येत आहे की सर्व नागरीकांनी आपला मालमत्ता कर/पाणीपट्टी वेळेत नगरपरिषद कार्यालयात येवून किंवा वसुली पथक जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा भरणा करावी. तसेच कर भरणा केल्याची पावती संबंधीत कर्मचाऱ्याकडून घ्यावी. *सदर मोहीमेअंतर्गत नगरपरिषदेचे कार्यालय दिनांक २३ मार्च ते २५ मार्च या सुट्टीच्या कालावधीत देखील सावंतवाडी शहरातील नागरीकांच्या सोयीसाठी कर भरणा करण्याकरीता सुरू ठेवण्यात येणार आहे*. *ज्या मालमत्ताधारकांनी आपला थकीत मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी कर भरणा केलेला नाही अशा १९० मालमत्ता धारकांच्या मालमत्तांवर महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औदयोगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १५२ अन्वये जप्ती अधिपत्र बजावून कर वसुलीची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. तसेच थकीत नळपट्टी असणाऱ्या २० धारकांचे नळकनेक्शन खंडीत करण्यात आलेले आहे.* तरी नागरीकांनी वरील प्रकारची कारवाई टाळण्यासाठी आपला मालमत्ता व पाणीपट्टी कर ३१ मार्च पूर्वी भरणा करावा असे आवाहन मुख्याधिकारी श्री. सागर साळुंखे यांनी केले आहे.