सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुका भंडारी समाजाच्या वतीने शुक्रवार दि. ८, शनिवार दि. ९ आणि रविवार दि. १० मार्च रोजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही क्रिकेट स्पर्धा सावंतवाडी तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा अशा दोन विभागात खेळवली जाणार आहे.
तसेच क्रिकेट ही स्पर्धा फक्त आपल्या न्याती बांधवांसाठी अर्थात भंडारी समाजासाठी असणार आहे. या स्पर्धेची सुरुवात शुक्रवार दिनांक ८ मार्च रोजी भव्य रॅलीने होणार आहे. सकाळी ठीक ९:०० वाजता शिरोडा नाका ते सावंतवाडी जिमखाना मैदान अशी हि भव्य मोटरसायकल रॅली निघणार आहे. या रॅलीत सर्व भांडारी समाजाचेच व्यक्ती सहभागी होऊ शकतात. अशी माहिती दिलीप पेडणेकर यांनी दिली आहे. या रॅलीत आणि क्रिकेट स्पर्धेत सहभागी व्हा आणि भंडारी समाजाची शान वाढवा असे आवाहन सावंतवाडी तालुका भंडारी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.