सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी गार्डन शेजारी तीन मुशीच्या वळणावरील नाला उघडा असल्यामुळे वाहनधारकांसाठी अपघाताचे ठिकाण बनलेले आहे. या अपघात ठिकाणाची पाहणी करताना माजी नगरसेवक उमाकांत वारंग विलास जाधव व बंड्या कोरगावकर यांनी खंत व्यक्त केलेली आहे. आणि ही गंभीर बाब नगर परिषदेच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. नगर परिषदेने या अपघात होण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणाची पाहणी करून यावर लवकरात लवकर उपाययोजना करावीच तत्पूर्वी नागरिकांच्या व वाहनधारकांच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी बॅरिगेट लावावे जेणेकरून अपघात घडून कोणाचाही प्राण गमवण्याची वेळ येऊ नये. अशी मागणी माजी नगरसेवक उमाकांत वारंग व विलास जाधव यांनी केली आहे.