सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी एसटी बस स्थानक दुरावस्था दूर करण्याबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा प्रवासी संघटना अध्यक्ष अण्णा केसरकर, ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, रवी जाधव, दत्तप्रसाद गोठस्कर, प्रदीप ढोरे, उमेश खटावकर प्रदीप नाईक, राजा शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, बंड्या तोरस्कर, दिलीप पवार, दीपक सावंत मनवेल अल्मेडा, सुधीर पराडकर, उदय भराडी, पत्रकार विनायक गावस यांनी एक मताने आंदोलन तीव्र आंदोलन छडलं होतं. आज त्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. आज पासून सावंतवाडी एसटी बस स्थानकाच्या परिसरातील रस्त्याचे काम, लाईट, तसेच पत्रे बदलणे व पेवरब्लॉकने खड्डे बुजवणे या कामाची सुरुवात युद्धपातळीवर सुरू झाली आहे. सदर काम सुरू झाल्याचे पाहून प्रवासी व नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे.