सिंधुदुर्ग: सामाजिक बांधिलकी, युवा रक्तदाता संघटना व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान या संघटनेंद्वारे काल दि.२३ आणि २४ मार्च रोजी औषधांबबाबत दररोजच्या रुग्णांच्या तक्रारी ऐकून शासनाकडून मिळणाऱ्या औषधांच्या तुतवड्यामुळे नेहमीच रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी वरील संघटनेंनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी औषधांच्या तुतवड्याबाबत चर्चा करून माहिती घेऊन त्या मागच्या समस्या जाणून घेतल्या व युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी सदर माहिती तातडीने शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांना दिली असता दीपक भाई केसरकर यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेतले व लगेचच ॲक्शन घेऊन आज रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचे औषधे पाठवण्याची तरतूद करून सदर औषधे आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पोचवली आहेत.
यामुळे आता गोरगरीब व मध्यमवर्गीय रुग्णांची महागड्या औषधाकरवी होणारी आर्थिक ओढाताण थांबणार आहे. यासाठी वरील सामाजिक संघटनेंनी विशेष ताकद लावून प्रयत्न केले होते आणि त्यांच्या या प्रयत्नाला आज खूप मोठे यश मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आज सर्व प्रकारची औषधे उपलब्ध झालेली आहे आणि ती पुढेही कमी पडणार नाही. याची ग्वाही शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांनी हा लढा लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना दिलेली आहे.
यासाठी शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांचे शहरवासी, ग्रामीणवासी, व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्यावतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहे.