Home स्पोर्ट सावंतवाडीत उद्या ‘ऑल द बेस्ट रन..!’

सावंतवाडीत उद्या ‘ऑल द बेस्ट रन..!’

107

सावंतवाडी  प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन मॅरॅथाॅन धावक प्रसाद कोरगांवकर व ओंकार पराडकर यांची द. आफ्रिकेतील काॅम्रेड मॅरॅथाॅनसाठी निवड झाली आहे. अवघ्या आठवडाभरात हे दोन्ही धावक द. आफ्रिकेच्या भूमीवर त्यांचा मॅरॅथाॅन ठसा उमटवणार आहेत.

 

मॅरॅथाॅन धावक प्रसाद कोरगांवकर व ओंकार पराडकर यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्या सावंतवाडी येथे विशेष अशी ऑल दि बेस्ट रनचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधू रनर्स, रांगणा रनर्स व PAWS यांच्या एकत्रित आयोजना द्वारे ही रन संपन्न होणार आहे.

उद्या २ जूनला सकाळी ६ वाजता सावंतवाडी राजवाडा येथून ही रन सुरु होणार आहे. त्यानंतर संपूर्ण मोती तलाव लगत फेरी मारत पुन्हा सावंतवाडी राजवाडा येथे येत ही रन संपन्न होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.