Home स्टोरी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने मानले प्रांताधिकारी व वनविभागाचे आभार.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने मानले प्रांताधिकारी व वनविभागाचे आभार.

94

सावंतवाडी: २७ मे रोजी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सावंतवाडी शहरातील तसेच झाराप हायवे, इन्सुली मेट, मळगाव मेट येथील रस्त्यावरील धोकादायक झाडे तोडण्याकरिता प्रांताधिकारी व वन विभाग अधिकारी यांना निवेदन दिले होते. शहरातील रस्त्याच्या बाजूला जीर्ण झालेली झाडं, रस्त्यावर झुकलेल्या धोकादायक फांद्या तात्काळ तोडून घ्या जेणेकरून पावसामध्ये पुन्हा कुठल्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये अशी निवेदनाद्वारे विनंती केली होती. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे आपल्याला पूर्णपणे सहकार्य लाभेल असेही आश्वासन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात आले.

सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल घेऊन सदर अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई चालू करून असे आश्वासन दिले होते व सदर आमच्या निवेदन निवेदनाचा विचार करून प्रशासनाने पावसाआधी कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून सदर अधिकाऱ्यांचेआभार मानण्यात आले या वेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खालील व रवी जाधव उपस्थित होते.