Home राजकारण सामाजिक क्षेत्रात जीव तोडून काम करणाऱ्या या चौघांना जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून...

सामाजिक क्षेत्रात जीव तोडून काम करणाऱ्या या चौघांना जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यावे हि नम्र विनंती..! रवी जाधव

105

सावंतवाडी प्रतिनिधी:  सामाजिक क्षेत्र म्हटलं की तेथे स्वतःच्या खिशातील पैसा व वेळ महत्त्वाचा ठरतो. तो पैसा आणि वेळ खर्च करून संकटात असलेल्या व्यक्तींच्या मदतीला धावून जात असताना जीवाची तमा न बाळगता तसेच वेळे – काळेचा विचार न करता सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःला निस्वार्थपणे झोकून देऊन माणुसकी जिवंत ठेवणारे हे चार व्यक्तिमत्व सावंतवाडी शहरासाठी खरोखरच आदर्श ठरले आहेत.

प्रथमता या शहरातील असं एक युवा व्यक्तिमत्व जे वयाच्या १७ व्या वर्षापासून आपला कामधंदा आणि कुटुंब सांभाळून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. रुग्णांसाठी रक्ताचा विषय आला की सर्वप्रथम नाव समोर येत ते देव्या सूर्याजी यांच ज्यांनी आपल्या युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून आज पर्यंत शेकडो रुग्णांचे प्राण वाचवून त्यांना जीवदान दिले आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळामध्ये दिवस रात्र त्यांनी लोकांची सेवा केली आहे खरोखरच त्यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान आहे. म्हणून असे तरुण पुढे येणे गरजेचे आहे.

तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील, रूपा गौंडर( मुद्राळे) व शेखर सुभेदार हे माझ्यासोबत निराधार व अपघात ग्रस्त रुग्णांच्या मदतीला दिवसा तर कधी रात्र-अपरात्री धावतात तसेच कोरोना काळामध्ये यांचही खूप मोठं योगदान आहे कोरोनाने निधन झालेल्या निराधार महिलांची अंत्यविधी या महिलांनी रात्रीचे बारा वाजता स्मशानात जाऊन स्वतः केली होती तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते सतर्क असतात त्याचप्रमाणे हॉस्पिटल क्षेत्रामध्ये २४ तास रुग्णांना सेवा देणे तसेच रुग्णांसाठी रुग्णपयोगी वस्तू दान करणे यामध्ये यांचे खूप मोठे योगदान आहे प्रसंगी पदरी पैसे खर्च करू अनेक निराधारांना अन्नधान्य व गोरगरीब रुग्णांना आर्थिक सहाय्य करून त्या रुग्णांना आधार देण्याचे काम या मंडळी कडून सतत होत असते तर दिव्यांग बांधवांसाठी, आश्रमांसाठी तसेच गोरगरीब कुटुंबांसाठी ते आधारवड समजले जातात विशेषतः हे सर्वजण स्थानिक आहे.

विचार करा आजच्या धावपळीच्या युगामध्ये लोकांसाठी २४ तास सेवा देणारे व्यक्ती क्वचितच सापडतील म्हणूनच अशा या व्यक्तींना आपण सर्व मिळून एक संधी दिल्यास त्या संधीच ते नक्कीच सोनं करून समाजामध्ये अजून जोमाने काम करतील हा विश्वास आहे. कारण समाजकारणाला राजकारणाची जोड हवी असते ती मिळाल्यास त्यांचं कार्य अजून सोपं होईल.

या चौघांनी कुठच्या पक्षातून किंवा कुठच्या वार्डातून निवडणूक लढवावी हा विषय महत्त्वाचा नाही तर ही चार माणसं कुठेही आणि कुठच्याही पक्षात निवडणुकीसाठी उभी राहिलीत तरी त्यांना आपण निवडून द्यायचं आहे हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे. सुरुवातीला ही माणसं कुठच्याही प्रकारचं इलेक्शन लढायला तयार नव्हती.आताच्या निवडणूका लढवणे इतकी सोपी गोष्ट नाही त्याला खूप आर्थिक पाठबळ लागतं परंतु अशी निस्वार्थ सेवाभावी माणसं जर मागे राहिली तर समाजाचा विकास कसा होईल यापूर्वीचे दिवस आठवत असतील तर आपल्याला याची नक्कीच कल्पना येईल की येथील जनतेला किती त्रास झाला होता.

ही माणसं समाजामध्ये लोकसेवेसाठी वावरत असतात प्रत्येकाच्या संकटात, सुखदुःखात सहभागी होत असता म्हणूनच अशी माणस पुढे येन काळाची गरज आहे. त्यांच्या या सेवाभावी कामाची पोच पावती त्यांना नेहमीच परमेश्वराकडून मिळत असते परंतु मतदार राजा आपल्या एक एक मताची पोच पावती त्यांना आपण द्याल याची पूर्ण खात्री आहे तुमचा विश्वास ते नक्कीच सार्थकी लावतील हा माझा विश्वास आहे कारण त्यांच्यासोबत मीही तुमच्या सेवेत कुठचंही इलेक्शन न लढवता जसा आता आहे तसा नेहमीच सतर्क राहीन बस एकच विनंती करतो, आम्हाला तुमची ताकद द्या आणि आपल्या सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये या आपल्या हक्काच्या चार माणसांना जाऊ द्या बदल नक्कीच घडेल याची खात्री देतो.