Home स्टोरी सातत्यपूर्ण अभ्यास केल्यामुळेच सुदृढ यशाला गवसणी घालता येऊ शकते…! विकास सावंत

सातत्यपूर्ण अभ्यास केल्यामुळेच सुदृढ यशाला गवसणी घालता येऊ शकते…! विकास सावंत

179

सावंतवाडी: आज सर्वत्र स्पर्धेचे युग आहे. हे न संपणारे युग असून या युगात यशस्वी होण्यासाठी जाणीवपूर्वक कोण काय बोलतात, काय करतात यांसारखे अनेक नकारात्मक विषयांकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्यपूर्ण अभ्यास केल्यामुळेच सुदृढ यशाला गवसणी घालता येऊ शकते. असे राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे आयोजित सी.ई.टी, एन.एम.एन.एस, स्कॉलरशिप, एम.के.सी.एल, ऑलिम्पियाड यांरख्या स्पर्धात्मक परीक्षेत कौतुकास्पद यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे संस्था अध्यक्ष विकास सावंत म्हणाले.

 

कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश धोंड यांच्या प्रास्ताविकपर भाषणाने झाली. त्यांनी शिष्यवृत्ती, स्पर्धात्मक परीक्षांविषयी राणी पार्वतीदेवी हायस्कूल व जुनियर कॉलेजच्या प्रगतीचा आढावा घेत, उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. तर विद्यार्थ्यांमधून मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शालांतर्गत व बोर्ड परीक्षाच्या सोबत स्पर्धात्मक परीक्षांचे देखील एकत्रित अभ्यास करणे गरजेचे आहे. व प्रश्नपत्रिका सोडवत सतत सराव करत त्या सरावात सातत्य ठेवणे आणि या परीक्षांच्या अभ्यासामध्ये समतोल तसेच वेळेचे नियोजन व वेळोवेळी शिक्षकांचे मार्गदर्शन याशिवाय यशाला गवसणी घालणे अशक्य आहे हे सांगितले.

यावेळी व्यासपीठावरती संस्थेचे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक.संचालक चंद्रकांत सावंत, श्रीमती सोनाली सावंत, प्रा.सतीश बागवे आणि माजी उपमुख्याध्यापक शेखर नाईक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापक प्रल्हाद सावंत, पर्यवेक्षक संप्रवी कशाळीकर, आनंदी कॉम्प्युटरचे संचालक मेघश्याम काजरेकर आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. रणजीत राऊळ , प्रा. दशरथ राजगोळकर, प्रा.संतोष पाथरवट, प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, प्रा.सविता कांबळे, डाॅ. अजेय कामत, प्रा. पवन वनवे, प्रा. विनीता घोरपडे , प्रा. माया नाईक., प्रा. राहुल कदम, प्रा. स्पृहा टोपले तसेच माध्यमिक विभागाकडील दशरथ शृंगारे, प्रिती सावंत, नामदेव मुठे, मानसी नागवेकर आदी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार आणि श्रीम. पुनम कदम यांनी केले. आभार श्रीमती संप्रवी कशाळीकर यांनी मानले