शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सदानंद कदम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना स्वतःची बाजू मांडायची संधी मिळू नये हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. सदानंद कदम यांच्याबाबत जे घडलं त्यावर कोणीच बोलत नाही. दुसरीकडे किरीट सोमय्या म्हणत आहेत की कोकणात जाणार आहेत. साई रिसॉर्ट वरती हातोडा मारणारच आहे. असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. किरीट सोमय्या यांना मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतले नाही त्यामुळे ईडीचे कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि ते काम करत आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. ईडीच्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोकणामध्ये जाऊन हातोडा मारण्यापेक्षा मुंबई मधील नारायण राणे यांच्या घरावर किरीट सोमय्या यांचा हातोडा चालत नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. आहेपरभणीच्या गंगाखेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अॅड. मिथिलेश केंद्रे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे बोलत होत्या.हे सदानंद कदम कोण आहेत तर ते रामदास कदम यांचे सख्खे भाऊ आहेत. रामदास कदम कोण आहेत ते हेच आहेत जे झेंडू बाम लावून रडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. रामदास कदम हे सांगताना ते विसरले होते की त्यांनी त्यांच्या मुलाला सेट केले आहे.आता दुसऱ्या मुलाला सेट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांनी परभणी मध्ये रामदास कदम यांच्यावर केली आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सदानंद कदम यांच्याकडे चहा पिण्यासाठी गेले आणि तिथेच घात झाला. किती सूडबुद्धीचे राजकारण असू शकतं जर रामदास कदम सख्ख्या भावाचा काटा काढू शकतो, हा माणूस तर बाकी कुणाचा होऊ शकतो का? जो माणूस सख्ख्या भावावर सूड उगवू शकतो त्याच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवायच्या, अशी टीका सुषमा अंधारे यांनी परभणीच्या गंगाखेड येथे रामदास कदम यांच्यावर केली आहे. परभणीतील याच सभेत खासदार संजय जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.दरम्यान, सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीकडून सदानंद कदम यांना १४ दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती.