सिंधुदुर्ग : सांगेली ते माडखोल रस्ता खडीकरण डांबरीकरण या जिल्हा नियोजन मधून १५ लाख रुपये मंजूर करून हा रस्ता उभारण्यात येत आहे. या रस्त्याचे माजी आमदार आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली साहेब यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे संचालक.रवी मडगावकर, सरपंच लवू भिंगारे, उप सरपंच संतोष नार्वेकर, सागर सांगेलकर, जि. प. सदस्य पल्लवी राऊळ, रसिका आईर, प्रमोद कदम, शांताराम सावंत, अनंत राऊळ,आणि तेथील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री तेली म्हणाले राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून या सह्याद्री पट्ट्याच्या भागात विकास निधी मोठ्या प्रमाणात आला आहे गावागावातील वाड्यावाड्यातील रस्ते खडी करण डावरे करण करून एक विकासाची गंगा या भागात पाहायला मिळत आहे. या भागाचा विकास आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे असे ते म्हणाले. यावेळी सरपंच श्री भिंगारे यांनी भाजपच्या माध्यमातून या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. याची पण या गावाचा विकास भाजपच करू शकते आता सर्वांना कळले आहे. असेही ते म्हणाले.