Home Uncategorized २७ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने “सन २०२४...

२७ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने “सन २०२४ मान्सून महोत्सवाचे” आयोजन.

121

सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री फाउंडेशन चा सन २०२४ मान्सून महोत्सव २७ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे या मान्सून महोत्सवात दरवर्षीप्रमाणे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वकृत्व सुदृढ बालक स्पर्धा भक्ती गीत गायन स्पर्धा रानभाज्या स्पर्धा. गरजू विद्यार्थ्यांना मदत व शैक्षणिक साहित्य वाटप. होतकरू दशावतार नाट्य मंडळांना आर्थिक मदत. अशा विविध उपक्रमाने यंदा मान्सून महोत्सव घेण्यात येणार आहे असे सह्याद्री फाउंडेशन च्या झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे अशी माहिती. संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.

सैनिक पतसंस्थेच्या शहर कार्यालयात श्री राऊळ यांच्या उपस्थित बैठक झाली यावेळी अध्यक्ष रवींद्र मडगावकर माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब. विजय चव्हाण सचिव प्रताप परब एडवोकेट संतोष सावंत प्रल्हाद तावडे माजी सभापती प्रमोद सावंत विभावरी सुकी हर्षवर्धन धारणकर सुहास सावंत. संजय मडगावकर आदी उपस्थित होते. या बैठकीत यंदाचा मान्सून महोत्सव चा शुभारंभ २७ जूनला सह्याद्री पट्ट्यात वकृत्व स्पर्धा व शैक्षणिक साहित्य वाटप गुणवंत विद्यार्थी गौरव या कार्यक्रमाने कलंबिस्त पंचक्रोशीत घेण्यात येणार आहे. १९ ऑगस्टला सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रमाने समारोप के ला जाणार आहे.

शैक्षणिक साहित्य वाटप २७ जुलै पासून ते ३ ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. तर ४ ऑगस्ट ला सावंतवाडी आदिनारायण मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता सुदृढ बालक स्पर्धा तर ११ ऑगस्टला सायंकाळी चार वाजता रान भाजी स्पर्धा आदिनारायण मंगल कार्यालय येथे होणार आहे. १८ ऑगस्टला भक्तिगीत गायन स्पर्धा,  सायंकाळी चार ते आठ विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे तर २७ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता कलंबिस्त हायस्कूल येथे सह्याद्री पट्ट्यातील शालेय स्तरावर वकृत्व स्पर्धा, त्यानंतर महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. तर १९ ऑगस्टला महोत्सवाचा समारोप केला जाणार आहे. यावेळी दशावतार नाटक आणि दशावतार कंपनील आर्थिक मदत केली जाणार आहे.

वकृत्व स्पर्धा २७ जुलैला होणार आहे. याबाबतची नावे कलंबिस्त हायस्कूल मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांच्याकडे नोंदवावीत. तरी सर्वांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो: सावंतवाडी सह्याद्री फाउंडेशनच्या बैठकीत मान्सून महोत्सव बाबत माहिती देताना संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, बाजूला संजू परब, रवींद्र मडगावकर, विभावरी सुकी, हर्षवर्धन धारणकर, प्रताप परब, एडवोकेट संतोष सावंत, प्रमोद सावंत, विजय चव्हाण, संजय मडगावकर, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत आदी.

छाया: भारत फोटो स्टुडिओ