Home स्टोरी सह्याद्री फाउंडेशनच्या नूतन अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर

सह्याद्री फाउंडेशनच्या नूतन अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर

93

सिंधुदुर्ग: सह्याद्री फाउंडेशन च्या नूतन अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर तर मुख्य कार्यवाहक पदी ऍड. संतोष सावंत, सचिव पदी प्रताप परब, खजिनदार सौ विभावरी सुकी, उपाध्यक्ष मोहिनी मडगावकर, हर्षवर्धन धारणकर, सहसचिव गजानन बांदेकर अशी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर आता सावंतवाडीत सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य, शिक्षण, संगीत या क्षेत्राला एक नवी दिशा देण्याच्या दृष्टीने सह्याद्री फाउंडेशन कार्यरत आहे.

सावंतवाडी ग्रामीण भागातील लोक शहरात नोकरी उद्योग व्यवसाया निमित्ताने कार्यरत आहेत. अशा सह्याद्री पट्ट्यातील मंडळींनी एकत्र येऊन गेल्या पंधरा वर्षांपूर्वी हे फाउंडेशन स्थापन केले आहे. आतापर्यंत या फाउंडेशनच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात सांस्कृतिक, सामाजिक चळवळ वाढवली जात आहे. या फाउंडेशनची वार्षिक बैठक माडखोल धरण सावंत फार्म हाऊस येथे बुधवारी सायंकाळी झाली. संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारणी निवडण्याबाबत चर्चा झाली. यावेळी मावळते अध्यक्ष प्रल्हाद तावडे, सचिव सुहास सावंत यांनी गेली तीन वर्ष कोरोना महामारीचा काळ असतानाही काम केले. आता या फाउंडेशनची व्याप्ती वाढत चालली आहे. त्या अनुषंगाने या फाउंडेशनच्या अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक माजी सभापती तथा संस्थापक सचिव रवींद्र मडगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर या फाउंडेशनच्या संपूर्ण कार्यक्रम रूपरेषा तसेच आधी विविध उपक्रम राबवण्यासाठी विशेष म्हणजे नव्याने एक पद नियुक्त करून मुख्य कार्य वाहक पदाची जबाबदारी या संस्थेचे माझी सचिव तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. तर दोन उपाध्यक्ष घे भरारी फाउंडेशनच्या अध्यक्ष मोहिनी मडगावकर व हर्षवर्धन धारणकर, सचिव पदी प्रताप परब, खजिनदार विभावरी सुकी, तर सहसचिव गजानन बांदेकर, संचालक विजय चव्हाण, प्रमोद सावंत, सुहास सावंत, प्रल्हाद तावडे, शशिकांत मोरजकर, संदीप सुकी, अशोक सांगेलकर यांची कार्यकारणी निवडण्यात आली आहे. यावेळी नूतन अध्यक्ष श्री मडगावकर व त्यांच्या टीमचे श्री सुनील राऊळ यांनी अभिनंदन केले यावेळी संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी स्पष्ट केले की, सह्याद्री फाउंडेशन च्या माध्यमातून वर्षभरात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत आणि एक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक चळवळ अधिक व्यापक केली जाणार आहे. तर नूतन अध्यक्ष श्री मडगावकर यांनी आपल्यावरही दिलेली जबाबदारी आपण समर्थपणे पेलेन आणि सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, संगीत अशा सर्व विभागाचे विविध उपक्रम राबवण्यात येतील आणि फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाभिमुख काम निश्चितपणे केले जाईल. सर्वांचे सहकार्य घेतले जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी सभापती प्रमोद सावंत, माजी अध्यक्ष विजय चव्हाण, विभावरी सुकी, मोहिनी मडगावकर, संदीप सुकी, सुहास सावंत, हर्षवर्धन धारणकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर संगीत व नाट्य गायन सचिव प्रताप परब यांनी गायले. सूत्रसंचालन व आभार मुख्य कार्यवाहक एडवोकेट संतोष सावंत यांनी केले. यावेळी फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.