Home स्टोरी सरकारच्या नाकर्तेपणामुळे तळवडे-नेमळे रस्त्याचे काम रखडले…! केतनकुमार गावडे

सरकारच्या नाकर्तेपणामुळे तळवडे-नेमळे रस्त्याचे काम रखडले…! केतनकुमार गावडे

115

अपूर्ण काम पूर्ण करा अन्यथा अनोखे आंदोलन छेडू….! जिल्हा काँग्रेस सचिव तथा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे यांचा इशारा

 

सावंतवाडी: तळवडे-नेमळे रस्त्याचे काम सद्यस्थितीत बंद आहे. यामागे सरकारचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. सरकारने यावर वेळीच तोडगा काढावा अन्यथा जिल्हा कॉंग्रेस आपल्या पद्धतीने अनोखे आंदोलन छेडणार. असा इशारा जिल्हा काँग्रेस सचिव तथा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे यांनी दिला आहे. याप्रसंगी सावंतवाडी बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता सरकारने ठेकेदाराला रक्कम दिली नसल्याने काम बंद ठेवण्यात आले आहे. तरी सरकारला या माध्यमातून एकच विनंती आहे की, या संपूर्ण परिस्थितीवर तोडगा काढून सदर रस्त्याचे कामकाज पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. असं केतनकुमार गावडे म्हणाले.