Home स्टोरी सम्राट अशोक जयंती निमित्त उद्या कल्याण पूर्वेत वनिताताई जाधव यांचे व्याख्यान,प्रबोधनात्मक संगित...

सम्राट अशोक जयंती निमित्त उद्या कल्याण पूर्वेत वनिताताई जाधव यांचे व्याख्यान,प्रबोधनात्मक संगित कार्यक्रम

222

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड):- चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती निमित्त उद्या कल्याण पूर्वेतील पार्वतीबाई मॅरेज हॉल, तिसगांव रोड येथे सुप्रसिध्द व्याख्यात्या आयु . वनिताताई जाधव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या विद्यमाने दि . ९ ते १४ एप्रिल दरम्यान भिमोत्सव साजरा केला जात आहे. याच भिमोत्सवा अंतर्गत चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या ९ एप्रिल या जयंती दिनी सायं ४ ते १० या वेळेत पार्वतीबाई मॅरेज हॉल तिसगांव रोड येथे सम्राट अशोक जयंती उत्सव साजरा करण्यात येत असून सम्राट अशोक यांच्या जिवनावर आधारीत वनिता ताई जाधव यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर जितेंद्र येळवणकर निर्मित सुरताल हा प्रबोधनात्मक संगित गित नृत्य यांचा मिलाप असलेला कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमास तमाम नागरीकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा आयु. सिंधुताई मेश्राम यांनी केले आहे .