Home स्टोरी समीर वानखेडे यांना २३ जूनपर्यंत अटक करू नये! मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा आदेश!

समीर वानखेडे यांना २३ जूनपर्यंत अटक करू नये! मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा आदेश!

71

९ जून वार्ता: अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्‍या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्‍याच्‍या आरोपाप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्‍या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना २३ जूनपर्यंत अटक न करण्‍याचे आदेश मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिले आहेत. ‘अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा रहित करा’, अशी मागणी सीबीआयने उच्‍च न्‍यायालयाकडे केली होती. ‘याचिकेत सुधारणा करण्‍याची अनुमती द्यावी’, अशी मागणी समीर वानखेडे यांच्‍या अधिवक्‍त्‍यांनी आता न्‍यायालयात केली आहे.