Home स्टोरी समता महिला मंडळ सावंतवाडी या सेवाभावी मंडळाकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दोन हाय...

समता महिला मंडळ सावंतवाडी या सेवाभावी मंडळाकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दोन हाय टच एक्वागार्डच्या मशीन सुपूर्त

170

सावंतवाडी: समता महिला मंडळ या मंडळाची स्थापना १९७७ साली झाली. आज या मंडळाला ४५  वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला रुग्ण व त्यांच्या नातविकांना शुद्ध पाण्याची सोय व्हावी याकरिता समता महिला मंडळ च्या कार्यकर्त्यांकडून हॉस्पिटल साठी दोन हाय टच एक्वागार्ड मशीन देण्यात आले. तसेच सदर दोन्हीही एक्वागार्ड मशीनच्या पाच वर्षाच मेंटेन्सी जबाबदारी स्वीकारली देखील स्वीकारले आहे. कित्येक वर्ष हे मंडळ विविध सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन सेवाभावी कार्यक्रम राबवत असते. त्यामध्ये पहिले ते सातवी होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना उत्तेजन देऊन त्यांना आर्थिक सहकार्य करणे, स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवणे, तसेच वृक्ष लागवड करणे व पर्यावरणीय पूरक कामे हाती घेणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करणे, ज्यावेळी सावंतवाडी महिलांना कुठचाही प्लॅटफॉर्म नसताना देखील तेव्हापासून आतापर्यंत महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक स्पर्धात्मक उपक्रम राबवले. अंकुर निवारा केंद्रात रोजगार संदर्भात मार्गदर्शन केले. महिला वर्ग सक्षम होण्यासाठी असे अनेक व विविध उपक्रम त्यांनी हाती घेतले. ही संस्था अद्यापही रजिस्टर नाही तरी पण कुठच्याही अनुदानाची अपेक्षा न करता स्वखर्चाने हे मंडळ अशा प्रकारची उपक्रम राबवत असते. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मंडळाचे अध्यक्ष तेजस्वी मळगावकर, सेक्रेटरी अश्विनी दळवी, खजिनदार छाया जगताप, तसेच या मंडळाचे फाउंडेशन मेंबर सुनीता लेले, किशोरी गव्हाणकर, सीमा मठकर ,मोहिनी मडगावकर, सुजाता परब, स्नेहा वझे, नेत्रा मुळी, आशा पालव, विना माडगूत, गायत्री देवखळी, भारती मठकर, भारती भाट, सुनिता रेडकर, अशा मुळीक, उज्वला कालेलकर, तसेच हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर एवळे ,डॉक्टर गिरीश चौगुले, डॉक्टर अशोक एडके, डॉक्टर श्रद्धा बोरा चिन्मय डाक्लीयर, डॉ. आमचूला कोचुरी, त्याचप्रमाणे कर्मचारी वर्ग तसेच पेशंट व त्यांची नातेवाईक यांनीही त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले आहे या कार्यक्रमाला जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याची व सामाजिक बांधिलकीची रवी जाधव उपस्थित होते.