Home स्टोरी सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या सततच्या लढ्याला यश.

सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या सततच्या लढ्याला यश.

59

मसुरे प्रतिनिधी: लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करीत सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी आणि मालकी हक्काचे घर व इतर प्रश्न सोडवत सुस्पष्ट आदेश जारी केल्याबद्दल आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे आभार मानले. याप्रसंगी मयुर देवळेकर, योजना ठोकळे, अनिल कांबळे, उदय पडेलकर, विजयभाऊ पवार, गिरधर मारु, दिपक पवार, कुंजाली मोरे, सतिश कांबळे, रविना जाधव, राजेश तांबे उपस्थित होते.