Home स्टोरी सन्माननीय श्री.सुरेश बिर्जे यांना जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टला समाजभूषण गौरव पुरस्कार प्रदान

सन्माननीय श्री.सुरेश बिर्जे यांना जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टला समाजभूषण गौरव पुरस्कार प्रदान

92

तिरोडा वार्ताहर (दिनेश मयेकर): समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे २०२४ गुरूपौर्णिमा निमित्ताने पार पडले. सन्माननीय श्री सुरेश बिर्जे साहेब यांना जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी यां संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या मानवतावादी कार्याचा सन्मानार्थ महाराष्ट्रसमाज भूषण गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .सदर पुरस्कार चित्रपट अभिनेते सन्माननीय श्री. अनिल गवस साहेब व सन्माननीय श्री. झाकिर खान साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी पुरस्कार स्वीकारताना संस्था अध्यक्ष सन्माननीय श्री. सुरेश बिर्जे साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय श्री. राजु बिर्जे साहेब, सन्माननीय श्री. विष्णू खोबरेकर साहेब, सन्माननीय श्री. सुहास कुडाळकर साहेब, सन्माननीय श्री. मोहन आरावंदेकर साहेब, सन्माननीय श्रीमती. नेत्रा साळगावकर मॅडम व सन्माननीय श्री.संतोष सांगळे साहेब उपस्थित होते.