Home जाहिरात सनसिटीचे दफनभूमीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रोश मोर्चा;

सनसिटीचे दफनभूमीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रोश मोर्चा;

70

वसई: वसईच्या सन सिटी येथे महापालिकेतर्फे बांधण्यात येणाऱ्या सर्व धर्मीय दफनभूमीच्या विरोधात रविवारी सकाळी हिंदुत्ववादी संघटनेने मोर्चा काढला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी दफनभूमीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन दगडफेक केली. तसेच दफनभूमीची भिंत पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. वसईच्या पश्चिमेच्या सन सिटी येथे सर्व धर्म दाखवणे बांधण्यात येत आहे. त्यामध्ये मुसलमान, प्रोटेस्टंट ख्रिस्ती तसेच हिंदू लिंगायत समाजासाठी तीन वेगवेगळ्या दफनभूमी तयार केली जात आहे. मात्र या ठिकाणी मुसलमानांची कब्रस्तान नको अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांनी या दफन झालेला विरोध केला आहे. याविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मूर्तीच्या सुरुवातीला संतप्त कार्यकर्त्यांनी गौतम बुद्ध परिसरात जाऊन दगडफेक केली तसेच भिंत पाडण्याचा प्रयत्न केला. मानकर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाहेर काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.