Home स्टोरी सकल हिंदू समाज संचालित – कल्याण पूर्वेत निघाली श्रीरामनवमी निमित्त भव्य शोभा...

सकल हिंदू समाज संचालित – कल्याण पूर्वेत निघाली श्रीरामनवमी निमित्त भव्य शोभा यात्रा !

102



कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड ): – मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा अतरण दिन अर्थात श्रीरामनवमी दिना निमित्त कल्याण पूर्वेत सकल हिंदू समाजाच्या विद्यमाने भव्य श्रीरामनवमी शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते . या शोभा यात्रेत कल्याण पूर्वेतील अनेक हिंदुत्ववादी संस्था संघटनांसह अन्य समाजाचे प्रतिनिधिही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

विठ्ठलवाडी येथील एस टी बस स्थानकापासून जय श्रीरामाच्या घोषणांसह सुरु झालेल्या या भव्य शोभा यात्रेत सकल हिंदू समाज बांधव हातात भगवा झेंडा घेउन आणि डोक्यावर भगवा फेटा परिधान करून शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते . या यात्रेत महिला वर्गाची उपस्थितीही लक्षवेधी होती .
अश्वरथातील भगवान श्रीरामाच्या प्रतिमेचे स्वागत आणि पूजन करण्यासाठी विठ्ठलवाडी बस स्थानक ते चक्कीनाका या दरम्यानच्या मार्गात विविध संस्था संघनांनी जय्यत तयारी करून भगवान श्रीरामाच्या प्रतिमेचे जल्लोषात स्वागत केले . या यात्रेत तामिळ बांधवांचे वाद्य पथक मुख्य आकर्षण ठरले तर डीजेच्या तालावर तरुणाई मोठ्या जल्लोषात थिरकतांना दिसली .


या शोभा यात्रेचा प्रारंभ विठ्ठलवाडी बस स्थानका पासून करण्यात येऊन समारोप चक्कीनाका येथे करण्यात आला . या यात्रेत आमदार गणपत गायकवाड, शहर प्रमुख महेश गायकवाड यांचे सह सर्वश्री नरेंद्र सुर्यवंशी, अमित सोनवणे, राजू अंकूश, गणपत घुगे, शाम शेळके, संजय मोरे, सुभाष म्हस्के, प्रशांत बोटे, संयोजन समितीचे अध्यक्ष हेमंत दराडे, समाजसेवक सत्यप्रकाश उपाध्याय, डॉ . प्रविण भुजबळ, विश्वनाथ अय्यर, सुंदरराज कोणार, सुभेदार नरेंद्र पाटील तसेच मिनाश्री उपाध्याय, कवियत्री सुरेखा गावंडे, समाज सेविका प्रिया जाधव, रागिणी सिंग, उषा गोकुळदास, वंदना सोनवणे, वंदना मोरे आदी मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .