Home स्टोरी सकल मराठा समाजाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटने बाबत महत्वाची बैठक…! सिताराम...

सकल मराठा समाजाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटने बाबत महत्वाची बैठक…! सिताराम गावडे

58

उद्या ठिक ४ वाजता आर. पी. डी. हायस्कूल मध्ये होणाऱ्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

 

सावंतवाडी: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मालवण राजकोट येथे पुतळा कोसळून झालेली विटंबना ही बाब महाराष्ट्रासाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या गुरुवारी संध्याकाळी ठीक चार वाजता आर पी डी हायस्कूल मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

घाई गडबडीत उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळतो व त्या पुतळ्याचे वेगवेगळे भाग सगळीकडे विखुरले जातात हे चित्र मन हे लावून टाकणारे आहे, त्यामुळे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ठिक ४ वाजता आर पी डी हायस्कूल मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी या बैठकीला सर्व मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केली आहे.

या बैठकीला पक्षिय कवच कुंडले बाजूला ठेवून सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली मते मांडावीत असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.