Home राजकारण संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणी येथे झालेल्या हाणामारीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणी येथे झालेल्या हाणामारीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

131

छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी मध्यरात्री दोन गटात राडा झाला होता. या नंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले शरद पवार?….अलीकडच्या काळात संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणी येथे काही प्रकार घडले आहेत. या दोन्ही ठिकाणी धार्मिक स्वरूप आहे की काय? अशी चिंता वाटण्याची स्थिती होती. यावर काही राजकीय लोकांनी मतं व्यक्त केली आहेत. पण या सगळ्यासंबंधी अधिक चर्चा होणं योग्य नाही. आता परिस्थिती निवळली आहे. तसेच हा धार्मिक प्रश्न आहे. अशीच परिस्थिती पुढे राहणार नाही, याची खबरदारी सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनी करावी. एकमेकांवर आरोप करण्याची संधी अनेकवेळा असते. मात्र जेव्हा धार्मिक तेढ वाढेल तेव्हा राजकारण्यांनी काळजी घ्यावी. असं शरद पवार म्हणाले.