Home राजकारण संजय राऊत हे जगातील सगळ्यात शहाणे आणि विद्वान नेते आहेत! उदय सामंत

संजय राऊत हे जगातील सगळ्यात शहाणे आणि विद्वान नेते आहेत! उदय सामंत

77

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली. संजय राऊत हे जगातील सगळ्यात शहाणे आणि विद्वान नेते आहेत. त्यांच्या समोर स्पर्धक म्हणून जगात एकही विद्वान शिल्लक राहिला नाही. देशातील सगळ्या विद्वानांचे राऊत हे महामेरू बनलेले आहेत. जगातील विद्वानांपेक्षा राऊत यांना जास्त अक्कल आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. राऊत यांनी सरकारी कागद दाखवून शहाणपण दाखवू नये अशी टीका सामंत यांच्यावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर ही खोचक टीका केली.

मविआचे बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. उरलेले १३ आमदारही शिंदेंच्या संपर्कात आहेत. अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे २० नेतेही शिंदे यांच्या संपर्कात आहेत ही देखील चर्चा आहे. काँग्रेसचे बडे नेते काल महाबळेश्वरला शिंदे यांना भेटले अशीही चर्चा आहे, असा गौप्यस्फोट करतानाच चर्चा भरपूर होऊ शकतात. पण ते सत्यात उतरलं पाहिजे, असं उदय सामंत म्हणाले. उदय सामंत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.