१३ जून वार्ता: ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या मंचावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या आगामी भागात भाजप नेते नारायण राणे हजेरी लावणार आहेत. त्यांचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. यावेळी नारायण राणे यांना एक व्हिडिओ दाखवण्यात येतो. त्यामध्ये संजय राऊत म्हणतात, ‘नारायण राणे हे केवळ पोपटासारखे बोलत असतात.. मागचा पुढचा विचार न करता..’त्यावर नारायण राणे म्हणाले, ‘संजय राऊत खासदार माझ्यामुळे झाला. मी त्याला खासदार केलं. नाहीतर हा खासदार झालाच नसता. मी तर म्हणतो, हे माझंच पाप आहे’ अशी टीका नाराजी नारायण राणे यांनी व्यक्त केली. हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.