Home स्टोरी श्री हनुमान जयंती उत्सव नरेंद्र डोंगर, जुनाबाजार, सावंतवाडी

श्री हनुमान जयंती उत्सव नरेंद्र डोंगर, जुनाबाजार, सावंतवाडी

137

सावंतवाडी प्रतिनिधी: आज गुरुवार दि. ६ एप्रिल २०१३ रोजी सालाबादप्रमाणे नरेंद्र डोंगर, जुनाबाजार येथे श्री हनुमान जयंती उत्सव नरेंद्र डोंगर, जुनाबाजार येथे उत्साहात साजरा होत आहे. या ठिकाणी हनुमान जयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी ६ वा. २६ मि. या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.सकाळी सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद आहे. सायं. ४ वाजता तीर्थप्रसाद सुरु राहणार. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा, महाप्रसाद व पूजेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ही श्री हनुमान मित्रमंडळ, नरेंद्र डोंगर, जुना बाजार सावंतवाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष सूचना: ज्या भक्तांना अभिषेक किंवा एकादशणी करावयाची आहे त्यांनी श्री. शिवप्रसाद बांदेकर- ९४०३०४९०७६ व श्री. रवी बांदेकर- ९१५८७८१५४८ यांच्याशी संपर्क साधावा. अभिषेक किंवा एकादशी करण्यात सर्व साहित्यासह रु. १५१/-