Home स्टोरी श्री स्वामी समर्थ मठ वर्धापन दिन २६ एप्रिल पासून!

श्री स्वामी समर्थ मठ वर्धापन दिन २६ एप्रिल पासून!

45

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): मसुरे मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त २६ ते २७ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १०:३० वा प्रायश्चित्त शांतीपाठ, गणेशपुजन, पुण्याह वाचन, नांदिश्राध्द, आचार्य वरण, प्राकरशुध्दी, देवता स्थापना, अग्निस्थापना, नवग्रह स्थापना, दत्तमाला मंत्र जप, ग्रहयज्ञ, लघुपूर्णाहूती, आरती,दुपारी १ ते ३:३० महाप्रसाद, संध्याकाळी ७ वा आरती, रात्री ८ वा भजने. २७ एप्रिल २०२३ सकाळी ८ ते दुपारी १ शांतीपाठ, प्राकरशुध्दी, स्थापित देवतापूजन, श्री स्वामी समर्थ दत्तायाग, बलीदान पुर्णाहुती, अभिषेक, आरती, गा-हाणे, दुपारी १ ते ३:३० – महाप्रसाद, संध्याकाळी ७ वा आरती, रात्री ८ वा भजने असे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व स्वामी भक्तांनी उपस्थीती राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री स्वामी समर्थ ट्रस्ट मसुरे (मर्डेवाडी) यांनी केले आहे.