Home स्टोरी श्री शामसुंदर कृष्णा गांवकर यांच्या “पुन्हा एक शुन्य” या कविता संग्रहाचे ...

श्री शामसुंदर कृष्णा गांवकर यांच्या “पुन्हा एक शुन्य” या कविता संग्रहाचे प्रकाशन शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी रोजी प्रकाशन….

255

सावंतवाडी प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषद सीबीडी बेलापूर शाखेचे विद्यमान अध्यक्ष श्री शामसुंदर कृष्णा गांवकर यांच्या “पुन्हा एक शुन्य” या कविता संग्रहाचे प्रकाशन शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी होणार आहे. कविता संग्रहाचे प्रकाशन योग विद्यानिकेतन वाशी, नवी मुंबई येथे कोकण मराठी साहित्य परिषदच्या अध्यक्षा मा. सौ. नमिता किर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास अनेक मान्यवर, कवी आणि लेखक उपस्थित राहणार आहेत. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक आणि एमपलाॅईज युनियनचे ऍड. एस. के. शेट्ये आणि त्यांचे सहकारी उपस्थित राहणार आहेत. या काव्य संग्रहाची प्रस्तावना प्रथितयश कवियत्री सौ. दमयंती भोईर यांनी लिहिली आहे. तर छपाईची बाजू श्री मोहन भोईर यांनी सांभाळली आहे. श्री. शामसुंदर कृष्णा गांवकर यांचा हा पहिलाच काव्य संग्रह आहे. त्यामुळे वाचकांच्या श्री. शामसुंदर यांच्या या विशेष काव्य संग्राहकडे विशेष लक्ष लागले आहे. अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषद सीबीडी बेलापूर शाखेचे विद्यमान अध्यक्ष आणि श्री. शामसुंदर यांनी दिली आहे.