Home स्टोरी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या उपलप विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध...

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या उपलप विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

204

अक्कलकोट: अक्कलकोट शहर ए वन चौक येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री उपलप विठ्ठल मंदिर येथे १७ जुलै रोजी सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानकडून साजरी करण्यात येणार असल्याची माहिती वटवृक्ष मंदिर व विठ्ठल मंदिर व्यवस्थापन समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.

एकादशी दिवशी पहाटे ५ वाजता महाअभिषेक, महापूजा होईल. तदनंतर विठ्ठल मंदिर भाविकांच्या दर्शनाकरिता दिवसभर खुले करण्यात येईल. सकाळी ७ ते ९ या वेळेत लातूर जिल्ह्यातील चिकुर्डा येथील श्री दत्त भजनी मंडळ, वडगांव ता.तुळजापूर येथील संत तुकाराम महाराज भजनी मंडळ इत्यादी भजनी मंडळांची भजन सेवा श्रींच्या चरणी रुजू होईल, तसेच सकाळी ९ ते ११ या वेळेत आळंदी देवाची येथील कीर्तनकार ह.भ.प.विजय महाराज पांचाळ यांची कीर्तनसेवा श्री विठ्ठल मंदिर पटांगणात सादर होणार आहे. महापूजेनंतर सकाळी ८ वाजता सर्व भाविकांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने उपवासाचे शाबूदाणा खिचडी, केळी, चहा इत्यादी फराळ प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे, तरी भाविकांनी दर्शन, भजन, कीर्तन, व फराळ प्रसाद सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.