कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड ): – हिल लाईन पोलिस ठाणे हद्दितील मौने कागडवाल मधील या पाड्यावर रहाणार्या एका मध्यमवर्गीय कुटूंबाचे अख्ये घर चोरट्यांनी लुटून नेले . परंतु या कुटूंबाच्या त्वरीत च्या उपजीवीके सह साधन सामुग्रीची मदत करण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड धावून गेले . त्यांच्या या औदर्या प्रती ग्रामस्तांकडून त्यांचे कौतुक होत आहे .श्रीमलंग पट्टयातील काकडवाला मधील या गावात रहाणारे आणि मोलमजूरी करून आपल्या कुटूंबीयांची उपजिवीका चालवणारे गोटीराम भिवा भोईर यांच्या घरी तीन दिवसांपूर्वी घरात कोणीही नसतांना अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून चादर, सररंजी, गादी या वस्तुंसह अख्ये घर लुटून नेल्याची घटना घडली होती . या जबरी जोरी मुळे हे भोईर कुटूंब अक्षरशः हतबल झाले होते . या घटनेची खबर लागताच शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी या कुटूंबाकडे धाव घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आणि काही दिवस का होईना या कुटूंबियांच्या उपजिवीकेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून या कुटूंबाला डाळ, गहू, तांदूळ, तेल, या जिवनावश्यक वस्तुंबरोबर चादरी, गाद्या आदी वस्तू तातडीची निकड म्हणून दिल्या . मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेल्या या आवश्यक वस्तूं मुळे भोईर कुटूंबियांसह ग्रामस्त मंडळींनी महेश गायकवाड यांचे आभार मानले .