देवगड :- कुणकेश्वर यात्रेसाठी श्री देव कुणकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ तारीखला शिवजयंती असल्याने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक देखावा लक्षवेधी ठरला होता.श्री देव कुणकेश्वर मंदिराच्या सभा मंडपापासून गाभाऱ्यापर्यंत अप्रतिम अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. शंभू महादेवाच्या शिवलिंगाभोवती सुंदर अशा शंभू महादेवाचे शिवलिंग सुंदर अशा पांढऱ्या फुलांनी सजवलेला आहे श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्रीचे यात्रेस शुक्रवार उत्तर रात्री साडेबारा वाजलेपासून पूजाविधी साठी सुरुवात झाली. लिंगायत गुरव यांच्या हस्ते झाल्यानंतर श्री देव कुणकेश्वराची शासकीय पूजा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर, प्र प्रांताधिकारी वर्षा सिंघम, पोलीस निरीक्षक सौरभकुमार अग्रवाल, यांच्या हस्ते शासकीय पूजा तसेच माजी नगरसेवक सुधीर जाधव , उद्योजिका रेखा भोईर ,तसेच आमदार नितेश राणे सहकुटुंब यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वराची विधिवत पूजा करण्यात आली. पूजाविधी झाल्यानंतर श्री देव कुणकेश्वरांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन रांगा अडीच वाजता खुल्या करण्यात आल्या. भाविकांनी रात्री अकरा वाजल्यापासूनच दर्शन रांगेमध्ये गर्दी केली होती. साधारणतः हजारो पेक्षा जास्त भाविकांनी आतापर्यंत श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले आहे. भाविकांना सुलभ आणि जलद गतीने दर्शन मिळेल अशी व्यवस्था देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.