Home स्टोरी श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर कारवाई करावी ! श्री तुळजाभवानी मंदिर...

श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर कारवाई करावी ! श्री तुळजाभवानी मंदिर संरक्षण कृती समिती’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन

41

१२ एप्रिल (वार्ता.): – श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार प्रकरण बंद करून न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान करणार्‍या शासकीय अधिकार्‍यांना बडतर्फ करावे, तसेच मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर ‘सीआयडी’च्या अहवालानुसार गुन्हे नोंद करावेत. यांसह अन्य मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्री तुळजाभवानी मंदिर संरक्षण कृती समिती’च्या वतीने देण्यात आले. या वेळी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, महंत व्यंकट अरण्य महाराज, तसेच सर्वश्री अजय साळुंखे, प्रशांत सोंजी, सुरेश नाईकवाडी, अमित कदम, सर्वाेत्तम जेवळीकर, सुदर्शन वाघमारे, परीक्षित साळुंखे आदी उपस्थित होते. या वेळी मंदिरामध्ये चालू असलेले सशुल्क दर्शन बंद करावे, तसेच तुळजापूर शहरातील नागरिकांना ठराविक वेळेत प्रतिदिन दर्शनाची सोय करावी या मागण्याही करण्यात आल्या.निवेदनात पुढे म्हटले आहे की,१. आतापर्यंत राजे-महाराजे यांनी देवीला मोठ्या प्रमाणात दान आणि अर्पण केले आहे. देवनिधी वाढवण्यासाठी भाविकांकडून मूल्य आकारले नाही. विधी आणि न्याय मंत्रालयाने ‘मंदिरात दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे मूल्य आकारता येणार नाही’, असे सुस्पष्ट आदेश दिलेले आहेत, तरी या आदेशाला केराची टोपली दाखवून मनमानी कारभार तुळजाभवानी मंदिर समितीकडून चालू आहे. त्यामुळे सशुल्क दर्शन तातडीने बंद करावे.२. तुळजापूर शहरातील नागरिकांना नियमित देवीचे दर्शन घेऊन दिवसाचा प्रारंभ करण्याची प्रथा शहरामध्ये शेकडो वर्षांपासून चालू आहे. या प्रथेला तडा देऊन मंदिर समितीने एकतर्फी निर्णय घेऊन हे दर्शन बंद केले आहे. त्यामुळे तुळजापूरच्या नागरिकांमध्ये असंतोष दाटून राहिला आहे.