Home स्टोरी श्री काळे यांच्या “काजवा” या पहिल्या साहित्यकृतीस वाचकांचा प्रचंड प्रतिसाद

श्री काळे यांच्या “काजवा” या पहिल्या साहित्यकृतीस वाचकांचा प्रचंड प्रतिसाद

263

मराठी साहित्य: श्री.पोपट श्रीराम काळे पूर्व शिक्षणाधिकारी पुणे महानगरपालिका यांचे “काजवा” हे आत्मकथन मनोविकास प्रकाशन, पुणे यांनी १८ जून २०२२ रोजी प्रकाशित केले होते. श्री काळे यांच्या “काजवा” या पहिल्या साहित्यकृतीस वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे केवळ ६ महिन्यात ४ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. “काजवा” या साहित्यकृतीला आजपर्यंत एक राष्ट्रीय व सहा राज्यस्तरीय पुरस्कार असे एकूण सात पुरस्कार जाहीर झाले आहेत.

लेखक श्री पोपट श्रीराम काळे
वाड्मय पुरस्कार २०२२
अभिरुची गौरव पुरस्कार २०२२

“काजवा” या साहित्यकृतीला आजपर्यंत जाहीर झालेल्या पुरस्कारांची माहिती. १) मराठी वाड्मय परिषद, बडोदे यांचा ‘अभिरुची गौरव पुरस्कार २०२२’ राज्य स्तरावरील पुरस्कार २) प्रकाश किरण प्रतिष्ठान, श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांचा ‘साहित्य गौरव पुरस्कार २०२२.’ ३) प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान, नांदेड यांचा ‘वाड्मय पुरस्कार २०२२’ ४) अंकुर साहित्य संघ, महाराष्ट्र शाखा सोलापूर यांचा ‘अंकुर साहित्य पुरस्कार २०२२.’ ५) राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालय, थेरगाव ता शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या संस्थेचा ‘राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार २०२२’ ६) शिवांजली साहित्यपीठ, चाळकवाडी जिल्हा पुणे यांचा ‘शिवांजली साहित्य गौरव पुरस्कार २०२३.‘ ७) मातंग साहित्य परिषद, पुणे यांचा “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाड्मय पुरस्कार २०२३”. हे “काजवा” या साहित्यकृतीला आजपर्यंत एकूण सात पुरस्कार जाहीर झाले आहेत.