Home राजकारण शेतकरी बागायतदार संघाच्या वतीने कुंबल गावचे माजी सरपंच प्रवीण परब निवडणूक रिंगणात.

शेतकरी बागायतदार संघाच्या वतीने कुंबल गावचे माजी सरपंच प्रवीण परब निवडणूक रिंगणात.

294

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण विभागात प्रथमच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शेतकरी बागायतदार संघाच्या वतीने यावेळी शेतकरी निवडणूक रिंगणात उभे राहण्याच्या दृष्टीने निर्णय झाला आहे. शेतकरी बागायतदार संघाच्या वतीने शेतकरी कुंबल गावचे माजी सरपंच प्रवीण परब येत्या २९ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शेतकरी बागायतदार संघाच्या वतीने त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. श्री परब हे शेतकरी बागायतदार संघाच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उभे राहणार आहेत यापूर्वी त्यांनी कुंभ्रल गावचे पाच वर्ष सरपंच म्हणून आदर्शवत असे काम केले आहे तसेच सुपारी नारळ बागायतदार म्हणून त्यांची ओळख आहे. आज रविवारी शेतकरी फळबागायतदार यांची बैठक झाली या बैठकीत श्री परब यांना उमेदवारी निश्चित करून २९ ऑक्टोबरला त्यांनी उमेदवारी अर्ज भरावा असे ठरवण्यात आले आहे… तरी तिन्ही तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी बागायतदार यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे