Home क्राईम शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये कमवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक…..

शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये कमवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक…..

105

शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये कमवून देण्याचे आमिष दाखवून लोकांना मुंबईतील एक टोळी लुटत आहे अशी बातमी समोर येत आहे. शेअर बाजारात गुंतवणुक करून पैसे कमवण्यासाठी सध्या अनेक लोकं पुढे येत आहेत. स्वतः ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लोकं अनेक मार्गाने प्रयत्न करतात त्यापैकी एक मार्ग म्हणजे शेअर आहे. पण काही लोकांनी शेअर मार्केटचा अभ्यास न करता, जास्त परतावा मिळण्याच्या आमिषाला बळी पडले आणि आणि याचाच फायदा एका टोळीने घेतला. जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस एका टोळीने लोकांकडून शेअर मार्केटच्या नावाखाली टीप देतो असे सांगून लाखो रुपयाचा गंडा घातला आहे. लोकांना शेअर मार्केटमध्ये टीप देतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले जात होते. त्यानंतर लोकांना शेअर मार्केटमध्ये लॉस करून पुढे या लोकांनी ठराविक कालावधीनंतर संबंधित लोकांशी संपर्क करणे बंद केले. त्यानंतर लोकांच्या लक्षात आले की संबंधित टोळी आपल्याला चुना लावून पसार झालेली आहे. शेअर मार्केटचा अभ्यास न करता आणि अति विश्वास ठेवला तर गुंतवलेल्या पैशाची फसवणूक होतेय हे अनेकवेळा आपण पाहतोय. शेअर मार्केटमध्ये फसवणूकीसाठी अनेक कंपन्या व त्यांचे एंजट आहेत. काही व्यक्तींनी जादा टक्केवारीच्या आमिषासह अनेक प्रलोभने दाखवली आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. योग्य पध्दतीने अभ्यास करून गुंतवणूक करून शेअर मार्केट मधून चांगला पैसा, परतावा देखील मिळता येतो हे ही तितकंच खरं आहे. परंतू त्याचा अभ्यास नसल्यास समोरच्या व्यक्तीच्या आमिषाला काही व्यक्ती बळी पडत आहेत.

शेअर मार्केटमध्ये असे लाखो रुपये कमवून देण्याचे अमिष दाखवून लुटणाऱ्या अनेक टोळ्या सध्या मार्केटमध्ये कार्यरत आहेत. या टोळ्या प्रथम काही मुलींचा वापर करून मुलींना इतर लोकांना कॉन्टॅक्ट करायला सांगून, स्वतःची मोठी रिसर्च कंपनी असल्याचे सांगून आणि चांगल्या टिप्स देण्याचे सांगून लोकांकडून ऍडवॉन्स पैसे अगोदरच घेतात. पण एका गोष्टीचा विचार करणं गरजेचे आहे की जर या लोकांकडे अशा टिप्स असतील तर हे लोक तुम्हाला देऊन तुमच्याकडून थोडेफार पैसे का घेतील? अर्थात ते त्या टिप्सचा वापर करून स्वतः पैसे कमवतील. या लोकांचा उद्देश असा असतो की जर त्यांच्या टिप्समुळे तुम्ही पैसे कमवले तर ते तुमच्याकडून 30% 40% किंवा 50% घेणार आणि जर तुम्ही पैसे कमावले नाही अर्थात लॉस झाला तर मात्र ते आपले फोन बंद करून गायब होणार. त्यामुळे कृपया आपल्या अशा लोकांपासून सावध रहा. तुमच्या जवळपासच एखादा तुमचा स्वतः ओळखीतला गुंतवणूक सल्लागार बघा. खरोखरच शेअर मार्केटमध्ये योग्य ती माहिती आहे की नाही याची खात्री करून घ्या आणि मगच त्याच्यासोबत काम सुरू करा. शेअर मार्केटचे योग्य ते प्रशिक्षण घ्या, योग्य पद्धतीने शेअर मार्केट शिकून घ्या आणि शेअर मार्केटमध्ये काम करा.

शेअर मार्केटमध्ये चांगल्या टिप्स देऊन पैसे कमवून देण्यासाठी फोन करणारे जास्तीत जास्त व्यक्ती हे मध्य प्रदेश, भोपाळ, गुजरात या ठिकाणचे व्यक्ती आहेत. यामध्ये मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, भोपाळ या ठिकाणच्या महिलांची संख्या जास्त आहे. या ठिकाणाहून जास्तच जास्त महिलांचे फोन येत असतात. त्यामुळे अशा फोन पासून सावध राहा. सावधगिरीने काम घ्या. अशा लोकांचे फोन टाळा. फोन आल्यानंतर फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीची योग्य ती चौकशी करा. जर फोनवर बोलणारी व्यक्ती आपल्या आजूबाजूची नसतील, त्यांच्याशी आपली ओळख नसेल तर त्यांच्या वर विश्वास ठेवू नका. आणि आपली जर फसवणूक झालीच असेल तर तात्काळ सायबर क्राईम मध्ये जाऊन योग्य प्रकारे सर्व माहिती देऊन तक्रार नोंदवा. तक्रार नोंदवण्यासाठी कधी मागे पडू नका. सर्वच नाही पण काही पोलीस तुम्हाला अनेक प्रश्न विचारतील आणि मूर्ख ठरवतील. पण त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्यासोबत जे काही घडलं ते सर्व सांगा आणि तुमची तक्रार नोंदवा. आणि तुमचा तक्रार क्रमांक घ्यायला विसरू नका. आज तुम्ही फसलात उद्या दुसरे फसू नयेत याची काळजी घ्या आणि सामाजिक बांधिलकी जपा.

काही लोकांना पोलिसांसमोर जाणं किंवा तक्रारी नोंदवणं खूप कठीण काम वाटत असेल किंवा काही पोलीस आपल्या तक्रारी नोंद करून घेत नसतील तर कृपया आम्हाला संपर्क साधा. तुम्ही दिलेल्या तक्रारींना खूप उशीर झाला असेल, खूप दिवस निघून गेले असतील आणि संबंधित पोलिसांकडून काहीच रिझल्ट मिळत नसेल तरी देखील तुम्ही आम्हाला संपर्क करा. आम्ही त्याबाबत योग्य ती माहिती घेऊन न्यूज नेटवर्क वर स्टोरी बनवून प्रसारित करू. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मोबाईल नंबर खाली देत आहोत.

पत्रकार -प्रसाद परब

9209391117/9146711702