Home स्टोरी शीतपेय विक्रेत्‍यांकडून ‘कुलिंग चार्जेस’च्‍या नावाखाली ग्राहकांची लूट!

शीतपेय विक्रेत्‍यांकडून ‘कुलिंग चार्जेस’च्‍या नावाखाली ग्राहकांची लूट!

80

सिंधुदुर्ग प्रतिनिधी:– सध्‍या उन्‍हाची तीव्रता वाढली असून बाजारात मोठ्या प्रमाणात विविध शीतपेयांना मागणी वाढली आहे; मात्र अनेक शीतपेय विक्रेते ‘कुलिंग चार्जेस’च्‍या नावाखाली ग्राहकांची लूट करत आहेत. काही दिवसांपासून उन्‍हाची तीव्रता वाढत आहे. त्‍यामुळे रसवंतीगृह आणि शीतपेय पिण्‍यासाठी ग्राहक गर्दी करू लागले आहेत. याचाच अपलाभ घेत काही दुकानदार ‘कुलिंग चार्जेस’च्‍या नावाखाली शीतपेयांच्‍या मूळ किंमतीहून अधिक किंमत ग्राहकाकडून वसूल करत आहेत. याविषयी ग्राहकांनी दुकानदारांना विचारले असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून छापील किंमतीहून अधिक किंमतीने वस्‍तू न विकण्‍याच्‍या शासनाच्‍या कायद्याचे शीतपेय विक्रेत्‍याकडून राजरोसपणे उल्लंघन केले जात आहे. येणार्‍या ग्राहकाची अडचण पाहून त्‍याच्‍याकडून मूळ किंमतीहून ३ ते ५ रुपये अधिक घेतले जात आहेत. शीतपेय आस्‍थापनाकडून याविषयी कोणतेही धोरण निश्‍चित केले गेले नसल्‍यामुळे याविषयी कुणाकडे तक्रार करायची? असा प्रश्‍न नागरिक उपस्‍थित करत आहेत. शीतपेयांना थंड करण्‍यासाठी लागणारी साधने, त्‍यासाठी लागणार्‍या विजेचा उपयोग याचा विचार केला असता, शीतपेय मूळ किंमतीत विकणे परवडत नसल्‍याचे विक्रेत्‍यांचे म्‍हणणे आहे.